इयत्ता 5 वी व 8वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ची तयारी उत्तम व्हावी म्हणून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केलेल्या वार्षिक अभ्यासक्रम नियोजनानुसार दरमहा शिकविलेल्या शिष्यवृत्ती /नवोदय परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित सराव ऑनलाईन टेस्ट दरमहा घेण्यात येवून त्याचा निकाल याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महत्वाच्या सूचना
1)इयत्ता पाचवी व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदर सराव परीक्षेचे नियोजन केलेले आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा दिशादर्शिकेनुसार माहे ऑक्टोबर 2023 अखेरचा असेल
2) विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोाइलद्वारे परीक्षा द्यावयाची आहे.परीक्षेची वेळ सायंकाळी व सकाळी ठेवण्याचे कारण पालकांचा मोबाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
3) विद्यार्थ्यांना नाव, शाळा, केंद्र व तालुका इंग्रजीत टाकण्याच्या सूचना द्याव्यात.
माहे ऑक्टोबर 2023 सराव चाचणी
पेपर 1 सराव चाचणी
1) मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी व गणित
2) उर्दू माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा आणि गणित
3) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी आणि गणित
पेपर 2 सराव चाचणी
1) मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी
2) उर्दू माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी
3) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा माहे ऑक्टोबर 2023 निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकनुसार पेपरनिहाय निकाल आपण पाहू शकता.
माहे ऑगस्ट 2023 शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका व निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
माहे सप्टेंबर 2023 शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका व निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.