शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

ICT Initiatives


शिक्षण विभाग प्राथ.जि.प.अहमदनगर अंतर्गत जि.प.शाळांत कार्यान्वित माहिती व तंत्रज्ञान आधारित उपक्रम.

Futuristic Classroom Z.P.School Panoli 




अमेझॉन फ्युचर इंजिनियर, लीडरशिप फॉर इक्विटी, कोड टू एनहान्स लर्निंग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद अहमदनगरचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री.आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वर्ष 2022-23 पासून CS Lab हा उपक्रम सुरू आहे.

या उपक्रमांतर्गत संगमनेर, नगर,कर्जत व जामखेड तालुक्यातील  16 शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अमेझॉन कंपनी मार्फत संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. 
यापैकी अहमदनगर आणि संगमनेर मध्ये विद्यार्थी संगणक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. 
त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाची देखील सुरुवात झालेली आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून
CS Hackathon Utsaw चे आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांनी 21 व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी, मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग, सांघिक कार्य (टीमवर्क), तार्किक  विचार आणि कोडिंग याचे ज्ञान वाढीस लागावे.   तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील  समस्या प्रभावीपणे सोडवण्याची कौशल्ये मुलांमध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था व शासन अनुदानित  शाळामध्ये कॉम्प्युटर सायन्स हॅकाथॉन उत्सव आयोजित करण्यात आला.
या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे जिल्हास्तरावर आयोजन करून त्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या  निवडक 7 शाळांतील 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांसाठी कोडींग कार्यशाळेचे आयोजन अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर पुणे येथे दिनांक 17 व 18 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते.
 सदर उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दोन दिवसांचे कोडींगबाबत तज्ञांकडून प्रशिक्षण घेऊन प्रोजेक्ट तयार करून त्याचे सादरीकरण केले.
  विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्टबाबत उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रमाणपत्र,भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सन्मानित केले व उत्कृष्ट तीन सादरीकरणांचा विशेष गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरावरून 5 जि.प. प्राथमिक शाळा व 2 माध्यमिक शाळा अशा एकूण  7 शाळांची कार्यशाळेसाठी निवड झाली होती. त्या शाळा खालील प्रमाणे
1.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेगाव बुद्रुक तालुका संगमनेर.
2.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क-हे तालुका संगमनेर
 3.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव लांडगा तालुका संगमनेर
 4.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट तालुका नगर 
5.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकमठाण तालुका कोपरगाव
6.कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव.
7. न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर तालुका पाथर्डी.
   यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील 21 तर माध्यमिक शाळेतील 15 असे एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
  सदर कार्यक्रमासाठी अमेझॉन कंपनीचे पुणे शाखेचे साईट लीडर श्री.अनिकेत सर व त्यांची टीम, LFE या स्वयंसेवी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुकर बानुरी ,Code to Enhance Learning या स्वयंसेवी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इरफान ललानी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भास्कर पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता श्री ज्ञानेश्वर लोटके, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सौ जयश्री कार्ले, LFE चे प्रतिनिधी श्री रविराज निंबाळकर व श्री तुकाराम लाळगे तसेच CEL चे प्रतिनिधी रश्मी शेख हे उपस्थित होते.