शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

ऑनलाईन शिष्य.सराव परीक्षा 2025

 इयत्ता 5 वी व 8वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ची तयारी उत्तम व्हावी म्हणून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी केलेल्या वार्षिक अभ्यासक्रम नियोजनानुसार दरमहा शिकविलेल्या शिष्यवृत्ती /नवोदय परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित सराव ऑनलाईन टेस्ट दरमहा घेण्यात येवून त्याचा निकाल याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

महत्वाच्या सूचना 

 1)इयत्ता पाचवी व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदर सराव परीक्षेचे नियोजन केलेले आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा दिशादर्शिकेनुसार त्या त्या महिनाअखेरचा असेल.
 2) विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोाइलद्वारे परीक्षा द्यावयाची आहे.परीक्षेची वेळ सायंकाळी व सकाळी ठेवण्याचे कारण पालकांचा मोबाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.  
3) विद्यार्थ्यांनी इयत्तनिहाय परीक्षेच्या पेपर च्या नावावर क्लिक करून परीक्षा द्यायची आहे.
4)विद्यार्थ्यांना नाव, शाळा, केंद्र व तालुका इंग्रजीत टाकण्याच्या सूचना द्याव्यात. 
5) परीक्षेची लिंक पेपरच्या नियोजित वेळेच्या 10 मिनिटे अगोदर ॲक्टीवेट करण्यात येईल.

माहे मे 2025 सराव चाचणी 

पेपर 2 सराव चाचणी 

वेळ रविवार दिनांक 25/05/2025 सायंकाळी 7:30 ते 9:00
1)  मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी 

2) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी

माहे एप्रिल 2025 सराव चाचणी 

पेपर 2 सराव चाचणी 

वेळ रविवार दिनांक 27/04/2025 सायंकाळी 7:30 ते 9:00
1)  मराठी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी 

2) मराठी माध्यम पूर्व माध्यमिक (इ.8 वी) पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी