शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

01 January 2023

जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागाचा ब्लॉग सुरु :

 जिल्हा परिषद अहमदनगर च्या प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक सूचना, शैक्षणिक साहित्यांचे स्रोत, माहिती व प्रेरणा देण्यासाठी शैक्षणिक ब्लॉग सुरु करताना अत्यानंद होत आहे. अल्पावधीत त्याचे अनावरण होऊन सर्व वाचकांसाठी तो उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये शिक्षकांसाठी वाचन प्रेरणा निर्माण होण्यासाठी वाचन केलेल्या साहित्याचे सारांश प्रकाशित केले जाणार आहेत. उकृष्ट सारांश लेखनासाठी बक्षिसाची योजना करण्यात येणार आहे. शिवाय शिक्षकांनी स्वत: लिहिलेल्या निबंध, ललित लेख, कविता, स्फुट लेखन व इतर अनुषंगिक लेखनाला देखील प्रसिद्धी दिली जाणार आहे. 
    जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांचे उपक्रम इतर शाळा व शिक्षकांसाठी माहितीसाठी व प्रेरणा म्हणून प्रसिद्ध केले जातील. अशा काही निवडक शाळांची यशोगाथा यशोगाथा या सदरात प्रसिद्ध केल्या जातील, प्रत्येक तालुक्याला योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. विद्यार्थी व शिक्षकांसाठी कोणकोणत्या स्पर्धा उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती स्पर्धाजगत या सदरात दिली जाईल व शिष्यवृत्ती परीक्षांचे ऑनलाईन सरावसंच सोडवण्यासाठी उपलब्ध असतील. सराव संच सोडवून चांगली प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन म्हणून  शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र तात्काळ दिले जाईल. 
    शिक्षकांना प्रत्येक वेळी सहज उपलब्ध करता येतील यासाठी महत्वाचे शासन निर्णय आणि परिपत्रके, विविध नमुने देखील डाउनलोड करण्यासाठी अथवा पाहण्यासाठी उपलब्ध असतील. जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सर्वांसाठीची गोपनीय वगळता सर्व पत्रे येथे उपलब्ध असतील. याचबरोबर महत्वाच्या शैक्षणिक व शासकीय वेब साईटची जंत्री देखील असणार आहे. या उपक्रमाचे जिल्ह्यतून नक्कीच स्वागत होईल यात शंका नाही. 
महत्वाचे :- सध्या साईटचे काम सुरु असल्याने सर्व पेजेस उपलब्ध नाहीत. दिवसेंदिवस यात बदल होत जाऊन पूर्ण क्षमतेने साईट सर्वांसाठी लवकरच सुरु होत आहे.
याचबरोबर शिक्षण विभाग (प्राथमिक) चे फेसबुक पेज व स्वतंत्र युट्यूब वाहिनी देखील सर्वांसाठी याच बरोबरीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.